नामदार डॉ. विश्वजित कदम: “गाव रिकामे होताना, ‘तो’ शेवटी उभा होता…”

(आज पूणदी येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री मा. नामदार डॉ. विश्वजित कदम यांनी ट्रॅक्टर मधून गावातून पूरपरिस्थिती ची पाहणी केली, यावेळी पलूस तालुक्याचे नेते श्री. महेंद्र (आप्पा) लाड, पूणदीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व युवक ग्रामस्थ उपस्थित होते. २०१९ च्या महापुरातिल नामदार ‘डॉ. विश्वजित कदम’ यांचे काम आजही डोळ्या समोर जसेच्या तसे उभे आहे. २०२१ ची पूर-परिस्थिति ही देखील तितकीच जीवघेणी आहे. या पार्श्वभूमीवर त्यावेळी शब्द-बद्ध केलेली ही कविता त्यांच्या आजच्या पुणदी आणि कृष्णा काठच्या गावांच्या भेटींच्या पार्श्वभूमीवर, कृतज्ञतेच्या भावनेपोटी प्रकाशित करीत आहे….)

“गाव रिकामे होताना, ‘तो’ शेवटी उभा होता”

वारस कर्तृत्वाचा, 
हा गहिवर माणुसकीचा.
पुराच्या छाताडावर पाय ठेवून उभा, 
नेता पलूस-कडेगावचा...                                   

पत्ता शोधत घराचा, कृष्णामाई माई दारी आली,
उर भरून जावा, तशी अंगणात भरुन उरली...
कष्टाने जे कमवले, जमेल ते मी सवे घेतले, 
माझ्या संगे देव्हाऱ्यातले, देव देखील बाहेर पडले. 

उर भरून नदी जेव्हा, कवतीकाने पावली,   
भरल्या दारी पदर पसरून,                                                                                                                                                                                                                             शांत उभी राहिली,                                                                                                                                                                                                                                     तिच्या पदरी सुख बांधून,                                                                                                                                                                                                                                            सारं शून्य करून गेली.. 

हम्बरताना गाय बघून, पाय मग मागे फिरले. 
घट्घट पाय उरात रोवून,                                                                                                                                                                                             घर माझे,                                                                                                                                                                                                                        मुके एकटेच मागे उरले.

रक्ताच्या नात्यानीही जेंव्हा फिरवली होती पाठ,
साहेबाच्या वाघाने बांधला, तेंव्हा कृतज्ञतेचा घाट... 

मगरमिठीतून पुराच्या, तो वेढा फोडुन पोहोचला होता..
माझ्यासाठी माझा आमदार, माहेर होवुनी धावला होता.. 

घुसली असती जी माझ्या पायात,
त्या काचेवर त्याने स्वतःचा पाय ठेवला होता, 
भळभळणारी जखम घेऊन, 
तो हसत मुखानं फिरला होता.

ऐकल होतं की,  
हळदी भरल्या अंगानं, बोहल्यावरून उतरताच, 
शेकडो मैल दुष्काळात तो, 
रणरणत्या उन्हात चालला होता,
पटलं हे तेंव्हाच, 
जेंव्हा संकटाच्या दारात, मला तो उरा-उरी भेटला होता...
 
“देवादारी बांधलेली, सगळीच घरटी शेणाची”, 
भिजली-बुडली डोळ्यादेखत, गेली कितीक वाहून, 
“पुन्हा एकदा सांधू आपण,” हा शब्द घ्या बांधून... 

त्यानचं तर रातोरात सारं गाव हलवलं, 
भूक लागली तेंव्हा त्यानचं, आख्ख गावं जेवू घातलं...  
डोक्यावरती आभाळ कोसळलं,
तेंव्हा त्यानचं तर पांघरून घातलं..
डोळे वाहून जाताना, 
त्यानंच फाटकं आभाळ झेललं ..

नको उपदेश अन कोरडी सहानुभूती, 
नकोत डोळ्यात दिसणारे ते अनंत उपकार,
‘गावातून जाणारा- 'असेन मी शेवटचा’, 
मरण दारात उभे होते तेंव्हा,                                                                                                                                                                                                                               त्याचे हे शब्दच झाले लाख मोलाचा आधार.. 

दिवस-रात्र महापुरात, अनवाणी तो फिरला होता,
मरणाच्या भीतीने, तो काठावरच थांबला नव्हता.
ज्याला ‘त्याने वाचवले’ तो ईश्वराचा अंश होता, 
वाचवलेला प्रत्येकजण,“त्याच्या कुटुंबातला” माणूस होता.

मदतीचा हात देताना, तो सर्वात पुढे होता.
गाव रिकामे होताना, तो शेवटी उभा होता.

आमच्यासाठी ज्याच्या डोळ्यात, 
आम्ही अश्रूंचा महापूर पाहिला,
माणुसकीच्या देवळात उभा, 
एक ‘देव’आम्ही पहिला...

...प्राध्यापक (डॉ) विवेक रणखांबे,  पुणदी (ता. पलूस)
भिऊ नका, काळजी करू नका….मी तुमच्या सोबत आहे! नामदार डॉ. विश्वजित कदम

5 thoughts on “नामदार डॉ. विश्वजित कदम: “गाव रिकामे होताना, ‘तो’ शेवटी उभा होता…””

  1. Dr. Vaibhav Dhamal

    अप्रतिम… केवळ अप्रतिम…
    प्रसंग जेवढा भीषण होता… तेवढाच आधार ही मोठा होता…

    फार सुंदर शब्दात मांडलय तुम्हीं…

  2. प्रा डॉ अविनाश म्हेत्रे

    सर
    खूपच हृद्य शब्दातील वर्णन

  3. Thigale sanjay Dadasaheb

    लोकनेता कसाअसावा…. सामान्य माणसाच्या दुःखात एका नव्या जोमाने उभा राहणारा…
    लोक प्रतिनिधी विषयी शब्दबद्ध केलेला भावनांचा कल्लोळ……. खूप छान..

  4. Miheer Ambawade

    अतिशय वास्तववादी आणि सुंदर विचार सर..!🙏

Leave a Reply to Ajinkya Shinde Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *