ति. आण्णांच्या सेवेशी….
एक कृतज्ञता पत्र स्वर्गीय ति. आण्णांना, शिरसाष्टांग नमस्कार, इहलोकीची यात्रा संपवून; तुम्ही पंचत्वात विलीन झालात, त्याला आता 14 वर्षे लोटली. पण तुमच्या आठवणीं शिवाय एकही दिवस सरला नाही. तूम्ही जीवन काळात पाहिलेल्या स्वप्नांचा पाठपुरावा करित, आम्ही मार्गक्रमण करीतच आहोत. आयुष्याच्या वाटेवर तुम्ही दिलेल्या संस्कारांची आणि स्मृतींची शिदोरी घेऊन काही संकल्प देखील परीपूर्ती साठी हाती घेतले …