“हे मृत्यो!” (आज सभोवार सुरू असलेल्या मृत्यूच्या तांडवात, कवी मृत्यूशीच संवाद करतो आहे. हतबल असा तो त्याच्यातल्या माणुसकीला साद घालतो आहे.)
“हे मृत्यो!” सध्या कुणाच्या तरी मृत्यूने मी सहजपणे हेलावून जात नाही. मी इतका शून्य, असहिष्णू, अमानवी कसा झालो, की संपून गेल्यात माझ्या संवेदनांच? याचा एक निश्चित ताळेबंद मांडतो आहे… भवताली मृत्युच्या असह्य वारंवारतेने मी पुरता थंड पडलो आहे. आणि हुंदकेही विरू लागलेत दुरवर; खोलवर…ते ही अगदी आतल्या आत सभोवताली चिताही आता एकांतात जळत आहेत. जणू …