जगण्याला बळ देणारी, जीवन सुन्दर करणारी गोवा भेट…

 ‘कसे कोठुनी येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून?’ या ओळीची प्रचिती म्हणजे आपली गोवा भेट. रक्ताची कोणतीही नाती नसताना, 30 वर्षापूर्वी आपण सर्वानी ३० दिवस एकत्र राहिलेल्या क्षणांच्या, आपल्या सह्वासाच्या साऱ्या आठवणी ३० वर्षे मनात जपून, सर्वानीच घडवून आणलेली ही भेट, संपता; संपता सगळ्यांचेच डोळे भिजवून गेली. समुद्राच्या भरतीच्या लाटा ओसरल्या पण गोवा भेटीच्या आठवनिंची ती भरती मात्र आयुष्यभर तशीच राहणार, हे नक्की.  

अपवाद वगळता, आपण सगळेच सामान्य कुटुम्बातुन आलेलो. आपल्या पिढ्या बोर्न-व्हिटा, फॅरेक्सच्या निश्चितच नव्हत्या. गुणवत्तेच्या बळावर आपण महाविद्यालयीन जीवनात आपली जागा निर्माण केली. कॉलेजला, विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवरचा सन्मान मीलवून दिला. थोडक्यात कॉलेजच्या इतिहासाचे एक भाग झालो. बहुतेक सगळ्यानी लग्नानंतर प्रेम केल, पण या वाटेवर एकच व्यक्ति वेगळ्या अर्थान यशस्वी होता आणि तो म्हणजे राजू पाटोदकर. युनिव्हरर्सिटी चेअरमनपदी निवड झाल्या नंतरच्या विजय-मिरवणुकितून थेट दिल्लीला येण्याच भाग्य लाभलेला, कॉलेजमध्येच मयूरा वहिनी बरोबर जमलेल्या प्रेमाला लग्नात बदलण्याचे भाग्य लाभलेला राजू सारखा एखादाच. बाकीचे सगळे, सर्वच बाबतीत काठावरच पोहणारे, ‘लग्नानंतर प्रेम करणारे’, स्वर्गात्ल्या बांधल्या जाणाऱ्या गाठीन्वर विश्वास ठेवणारेच होतो. १९९१ चा जानेवारी संपता-संपता घरी परतलो, पुन्हा कदाचित, कधीच न भेटण्यासाठी, पण सगळ्याच्याच भाग्यात काही वेगळच लिहिलेल होतं.

राजू पाटोदकर, जाफरभाई यांनी त्यांच्या सर्व यंत्रणा वापरून घेतल्या गेलेल्या अथक परिश्रमातुन, शोधातुन आणि सुभाषच्या डायरीत आपण लिहिलेल्या घराच्या पत्त्यातुन या मोहिमेचा जन्म झाला आणि एकदाचे सगळे एकत्र आलो. तारीख ठरली ११ मार्च, २०२१.  शोधा अंती अस कळलं की १९९१ चे आपण आजच जीवनाच्या विविध क्षेत्रात नाव कमावते झालो आहोत. राजू आणि मयूरा वहिनी यांनी थेट मंत्रालयातच आपला संसार थाटला आहे, ‘देश का नेता कैसा हो’ या कॅटेगरीत पोहचत; जाफरभाई यवतमाळ कांग्रेसचा अध्यक्ष झाला आहे, आपला प्रिय मित्र धनराज ज्याने गोवा ट्रिपच्या आधीच एक छोटे समेल्लन घडवून आणले त्याने “LIC सोबतच मातीचा टीळा भाळी लावला आहे”. संगीता शिक्षक म्हणून कार्यरत आहे, साधनाने आपले नाव सार्थ करीत चार विषयात एम्. ए. आणि समाजशास्त्र विषयात पीएच. डी. ही पदवी प्राप्त केली आहे. किशोरभाऊ महाराष्ट्र को-ओपरेटीव्ह बँकेचा मनेजर आहे. विजयची घोडदौड खुपच अभिमानास्पद. ४३ देशांचा प्रवास करुन आलेला आपला हा मित्र आज सोनालिका ट्रक्टरचा जिल्हा वितरक आहे.

पुणे विभागातुन आलेली सुचित्राने महेशजिंच्या सोबत व्यवसायाच्या माध्यमातून अमेझोन वर धड़क मारली आहे. महाराष्ट्रातील गरजू मुलांसाठी पुण्यात निवासाची व्यवस्था करीत, हडपसर येथे स्वतंत्र यंत्रणा उभी करत आनंद ‘जी-एस-टी’ सल्लागार म्हणून काम करतो आहे. वृंदा तांबोळीची आता वृंदा पंडित झाली आहे अणि नवऱ्याच्या पर्यटन व्यवसायाला हातभार लावत; ती ‘ऐकू-न-येणाऱ्या’ मुलांच्या शालेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सुभाष खरबस हा हिंदीचा शिक्षक म्हणून अकोले (जि. अहमदनगर) इथं कार्यरत आहे. कोल्हापूरची सुप्रिया आता मुंबईत मालाड इथे पोलिस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. कल्पना गुजरात मध्ये बलसाड मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.

विदर्भ-मराठ्वाड्याची लेक असुनही भावना तिकडे गोव्यात केन्द्रीय विद्यालायात शिक्षक होत भाग्यवान ठरली आहे, तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणार समाधान काही वेगळच होतं. दोघेही पति-पत्नी मराठीचे शिक्षक, ते ही एकाच विद्यालयात. गोवा ट्रिपचे यजमान म्हणून ज्याने कामाचा खुप भार उचलला तो शैलेश तर साक्षात् मंगेशीचा पुजारी झाला, ज्या वयात आणि ज्या युगात त्याला भौतिक सुखात रममाण होता आलं असतं, त्या काळात परंपरेचा पाइक होणं त्यान पसंत केलं. मेधा तिच्या यजमानांच्या बरोबर “सेंद्रिय” शेतीपुरक व्यवसायात हातभार लावते आहे. हव्यासापायी माणूस नष्ट करू लागलेल्या मातीच्या रक्षनाचं हे काम. तर प्रत्येकाच्या मनात ज्याची भेट व्हावी असे वाटतं होते तो ऑस्विन तिकडे इंग्लैंड मध्ये सुखासीन आयुष्य जगतो आहे.   

अशी ही विखुरलेली पाखरं पुन्हा एकत्र येण शक्य नव्हतं, पण जाफरभाई आणि राजूने चंग बांधला. व्हर्चुअली व्हाट्सैप वर एकत्र येणारे प्रत्यक्षात एकत्र येतीलच, असं नव्हत आणि तसच घडायलाही लागलं होतं. रिझर्वेशन मिळत नव्हती, गाड्या ठरत नव्हत्या, एकमेकांचा अंदाज घेत बरेचजण काय होतयं त्याची वाट पहात होते. विजयचा रुममेट कुलगुरुपदी विराजमान झाला, त्यामुळे त्याचेही अनिश्चित वाटू लागले. उभा महाराष्ट्र आता बेड-रेस्ट घेणार असे वाटायला लागले. महत्प्रयासाने जमवलेली १८-१९ ही संख्या बरीच खाली येत गेली. पण तिकडे सुप्रियाने मात्र कुणाचीच वाट न बघता, सगळ्यांचेच होटेल बुकिंग करून ट्रिपच्या वाटेवरचा एक मोठा अड़सर दूर केला आणि सांगण्यासाठी कुणाकडेच कोणतेच निमित्त उरले नाही.

पणजी-गोवा हा परिसर असून असून किती असणार? असा विचार करणारऱ्याना ‘गोवा हे गाव नसून ‘राज्य’ आहे’ असे खास समजुन सांगावे लागले. दोन जिल्ह्यात विभागलेला तो एक विस्तीर्ण परिसर आहे आणि आपले होटेल उत्तर गोव्यात तर यजमान दक्षिण गोव्यात आहे, हे शैलेशला सांगावेच लागले. आणि तिथे गेल्या नंतर ते सर्वानी अनुभवले देखिल.

सेनापतिची टीम असल्याने नागपूरकर आधीच तैयारच होते आणि त्याना खुद्द जाफरभाईचा धाक होता. धनराजच्या शेतावर जात नागपुरकरानी गोवा ट्रिपची ट्रायलही घेतलेली होती. इकडे निमित्ताचा रोग झालेल्या माझ्या सारख्या पुणेकरांवर राजू पाटोदकर नावाच भुत स्वार झालं होत. त्याला गरज नसताना पुण्याच्या व्हाटसप ग्रुप मध्ये घेण्याची चुक मी केलेलीच होती. पण त्याला आमचा पुरेपुर  अंदाज होता, आम्ही ऐनवेळी दगा देणार याची त्याला खात्री होती, म्हणुनच त्याने शेवटपर्यंत आमचा पिच्छा सोडला नाही. विक्रमाच्या मानगुटीवर वेताळ स्वार व्हावा तसा तो आमच्या मानगुटीवर स्वार झाला होता. जी गाडी आम्हां पुणेकराना करता आली नाही ती शेवटी त्याने मुंबईत बसून ठरवली. पण इकडे आनंदच्या मुलाच्या ट्यूशनचे शिक्षक पोझीटिव्ह निघाले आणि घरातील सगळ्यान्चिच तपासणी करावी लागली. वृंदाच्या वडिलांच्या कड़े लक्ष द्यायला कुणाची तरी सोय झाल्या खेरीज तीला येणे शक्य नव्हते. अशातच शेवटी १० मार्चचा तो दिवस उजाडला. नागपूरकर-यवतमालवाले महाराष्ट्र एक्सप्रेसने कोल्हापुरसाठी रवाना झाले. त्यांचे निघाल्याचे फोटो ग्रुपवर आले तेंव्हा कुठे आम्ही पुणेकरानी आपल्या बगा भरल्या, पण आता जायचे हे निश्चित झाले.

दि. ११ चा दिवस महाशिवरात्रिचा होता. राजू मुंबईहून तर सुभाष अकोलेहून सकाळी ११ वाजता माझ्या घरी आले. दोघेही धर्मपरायण असल्याने दोघांचाही उपवास होता आणि त्यामुळे माझी सौभाग्यवती, मेघना हिने ख़ास उपवासाचाच  बेत आखला होता. राजू, सुभाष आणि सुचेत्रा येताच आमचे एकमेकांबद्दलचे प्रेम पाहून, आपला बाप इतका मनमोकला असल्याचे माझ्या पोरानी पहिल्यांदाच अनुभवले. सुचेत्राने विश्रांतवाडी हुन येता येता सुभाषला आणलं आणि वाटेत धनकवड़ीला आनंद जॉइन झाला.  सुदैवाने त्याच्या घराती सगळ्यान्च्याच कोरोना टेस्ट्स निगेटिव्ह आल्या आणि दुपारी १२ वाजता पुणेकराना घेवुन, राजू पाटोदकर कोल्हापुरसाठी रवाना झाले. मित्राचा सत्कार करुण विजयराव स्वत: गाडीत बसले आणि सर्वात उशिरा निघून सर्वांच्या आधी होटेल मध्ये पोहोचले.    

जाफर भाईचा रुबाब मोठा. कोल्हापुरात येण्याआधीच दिमतीला गाडी तैय्यार होती. कोल्हापुर शहर-जोतिबा-पन्हाला आणि आई अंबाबाईचे दर्शन घेवुन सगळेच पाठीमागुन येणाऱ्या आम्हां पुणेकरांची वाट बघत होते. जाफ़रभाई मुळे सगळ्याना भर कोरोना काळात व्हीआयपी देवदर्शन झाले. केशवराव भोसले नाट्य गृहाच्या दारात गळाभेट घेताना सगळ्यान्चेच डोळे भरून आले. त्या भेटीत स्त्री-पुरुष भेद असा कसलाच भेद नव्हता. उन्यापुऱ्या पन्नाशीतली ही माणसं एकमेकाला कडकडून भेटतायत, हसतायत पण आणि डोळे भरून रडतायत सुद्धा, असं एक सुन्दर दृश्य लोक पहात होते, पण त्याचे भान कुणालाच नव्हते. असे दृश्य फक्त माहेरचा माणुस भेटल्यावरच अनुभवता येते. राजाभाऊची भेळ खावुन, उरलेल्या सर्वांचे अम्बाबाई-दर्शन उरकून कोल्हापुर गेस्ट हावुस वर आलो तेंव्हा रात्रीचे ८ वाजत आले होते. पहाटे गोव्याला निघायचे होते.

सकाळी ६ वाजता दोन्ही गाड्या शिवाजी विद्यापीठ, निपाणी-अम्बोली मार्गे गोव्यकड़े मार्गस्थ झाल्या. कोल्हापूरच्या गाडीचे ड्रायव्हर राहुलजी यांना रस्त्याची चांगलीच माहिती होती. अम्बोली घाटात प्रसिद्ध धबधब्या जवळ गाड्या थाम्बल्या. इतक्या उंचा वरून कोसळणाऱ्या त्या धबधब्याची क्षीण होत गेलेली एक संततधार अजूनही वहात होती. त्या शुष्क-कोरड्या ठणठणीत धबधब्यातले सगळे कोरडे पाषाणही आम्हाला भावले आणि भर पावसाळ्यात भिजत असल्यासारखे आम्ही तिथेही  रमलो. भर पावसाळ्यात तिथे कुणीही फोटो काढिल, पण आपण भर उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या धबधब्यात भिजत असल्यासारखे फोटो काढू शकलो, न वाहणाऱ्या त्या प्रपातावर प्रेम करू शकलो, कारण आम्ही आमचेच राहिलो नव्हतो.        

रस्त्यात खुप भूक लागली होती. मुमबई हायवेवर एका चांगल्या होटेलात सगळ्यानी अक्षरश: एका कुटूम्बातल्या  भावंडा सारखा, प्लेट शेअर करत नाश्ता केला आणि दुपार होता होता गोव्यात होटेल वर दाखल झालो.

होटेलच्या दारात हातात हार घेवुन सर्वांच्या स्वागतासाठी विजय उभा होता. ३० वर्षा नंतर घरातून बाहेर पडलेल्या सर्व सैराटांचे अर्थात सर्व मित्रांचे विजयने आणि होटलच्या लेडी रिसेप्शनिस्टने मैत्रिनिंचे जे स्वागत केले, ते भन्नाटच होते. त्याच्या या अशा स्वागताने थोड्या वेळासाठी आपण परदेशी आल्याचा भास झाला आणि लग्नानंतर पहिल्यांदाच कुणीतरी गळ्यात हार घालत होतं, हे ही ध्यानात आल. सुप्रियाने बुक केलेल्या लॉजवर बॅगा टाकुन, थोड़े फ्रेश होवून जेवण्यासाठी बाहेर पडलो. एका अलिशान होटेलमध्ये शैलेशने जेवणाची व्यवस्था केलेलीच होती.  

भावना, मेधा आणि वृंदा आधीच पोहोचल्या होत्या. खरया अर्थाने इथे सगळे ३० वर्षानी एकत्र आलो. जेवण उरकून आम्ही जे बाहेर पडलो ते पुढे किल्ला बघून, डॉल्फिन पहाण्यासाठी समुद्रात गेलो. प्रत्येक वेळी शैलेशची ‘गोवन कोंकणी भाषा’ तो स्थानिक असल्याची समोरच्याना जाणीव करुण देत होत. किम्बहुना, त्यामुले आपले कितीतरी पैसे वाचत होते. रात्र होता होता, क्रूजवर जायचं ठरलं आणि मग पुढचे चार तास कुठ गेले ते कळलच नाही. एक दिवस आधी प्रवास करुनही, अपुरी झोप घेवुनही शरीर थकलेलं नव्हतं. प्रत्येकाला न थकता एकमेकाच्या सहवासाचा आनंद लुटायचा होता. रात्री जेवण करुन कधी झोपलो ते कळलच नाही.  

रात्र होता होता, क्रूजवर जायचं ठरलं आणि मग पुढचे चार तास कुठ गेले ते कळलच नाही. एक दिवस आधी प्रवास करुनही, अपुरी झोप घेवुनही शरीर थकलेलं नव्हतं. प्रत्येकाला न थकता एकमेकाच्या सहवासाचा आनंद लुटायचा होता. रात्री जेवण करुन कधी झोपलो ते कळलच नाही.  

नव्याने बांधकाम केलेल्या त्या लॉज मधल वातावरण मनाला खुपच भावणारं होतं. अक्षरश: दारात असलेल्या स्विमिंग टैंक आणि त्यात पोह्न्यात आलेली मजा अविस्मरणीयच असेल. केवळ दोनच मिनिटान्वर समुद्र असतानाही, टैंक मध्ये पोह्न्याचा आनंद घेणे सर्वानाच प्राधान्याचे का वाटत होते? याचे गूढ़ मनात आजही कायम आहे. याचे उत्तर एकच की की आपली झालेली भेट ही इतर कुठल्याही आनंदात मोजताच येणार नव्हती. त्यामुळे टैंक हा समुद्रासारखाच होता.

दि. १३ मार्चचा तिसरा दिवस उजाडला तो शैलेशच्या घरी जाण्यासाठी. उत्तर गोवा ते दक्षिण गोवा असा प्रवास सुरु झाला. सेंट झेवियर चर्च, त्या पुढील कैथेड्रल, गाईडने सांगितलेला इतिहास, गोव्याच्या मूळ नागरीकँवर अल्फ़ान्सो-दि-अलबुकर्क आणि पोर्तुगिजांनी धर्मान्तर करताना केलेले अत्याचार, देवदेतांच्या भग्न-आणि-च्छिन्न-विच्छिन्न केलेल्या मूर्ति, हे बघून काही शतकांपूर्वी पुर्वजांनी सोसलेल्या अत्याचाराचे संग्रहालयात घेतलेले दर्शन मन हेलावून सोडणारे होते. ज्यानी धर्मान्तरास नकार दिला, त्यांचे हात कलम करण्यासाठी त्याना ज्या खाम्बाला बांधायचे  आणि जाहीरपणे त्यांचे हात तोडायचे, हायवेवर आजही असलेला तो खांब, हायवे ओलांडताना शैलेशने अवश्य दाखवला. त्यानंतर पुढे शैलेशच्या घरात असलेल्या भुयाराची चौकशी करता, पोर्तुगीज आणि परकीय स्वाऱ्यापासून स्त्रियांचे रक्षण व्हावे, हाच या भुयारांचा मुख्य उद्देश होता, या त्याच्या सांगन्यातुन आधी कैथेड्रल मधील संग्रहालायत पाहिलेल्या सगळ्याच इतिहासाला दुजोराच मिळत गेला.  

शैलेशच खुपच मोठ असलेल सुन्दर घर, कुटुंब वस्त्सल स्वभावाची त्याची आई अणि अतिथ्यशील सौ. मयूरा वहिनी यांच्या सहवासात दोन तासापेक्षा अधिक वेळ कुठे आणि कसा निघून गेला ते कळलच नाही. थोडक्यात सांगायच तर त्याच्या घराची एक छोटेखानी सहलच झाली. घरातली प्रत्येक गोष्ट तो अगदी आपलेपणाने दाखवत होता. त्याची माहिती देत होता. त्याच्या घरात मोठा करून लावलेला आपल्या परेडचा फोटो आपली ३० वर्षा नंतर झालेली पुनर्भेट जीवंत करीत होता. साहजिकच न राह्वल्याने तिथे “बदलेंगे तस्वीर गाव की, हम एन. एस. एस. के नौ-जवान, आओ राष्ट्र की सेवा करेंगे, हम एन. एस. एस. के नौ-जवान”, हे एन. एस. एस. गीत आपण सगळेच म्हणालो. दिल्लीत  पंतप्रधान, राष्ट्रपति आणि उपराष्ट्रपति यांच्या निवासस्थानाला मिलालेला सन्मान शैलेशच्या घरालाही लाभला.

मंगेशीच्या विस्तीर्ण मंदिरात केवल शैलेश मुळेच प्रवेश मिळाला. शांतादुर्गा मंदिरातील दर्शन उरकून पुन्हा होटेलवर आलो. संध्याकाळी प्रत्येकालाच १९९१ पासून पुढे आपल आयुष्य कस गेल? काय काय कमावलं? काय गमावलं? याच्या निवेदनासाठी अल्प-स्वल्प वेळ उपलब्ध करुन देण्यात आला. पोरी माहेरी आल्या होत्या, ‘अवघाची संसार सुखाचा करीन’ या भावनेतुन मनं मोकळी झाली. वृंदा पुण्याला परत फिरणार होती, एक कॉमन फोटोग्राफ घेवुन आम्ही रात्री तिथेच जेवण घेतलं. दिवस भर फिरूनही शरीर थकलं नव्हतं. रात्री २ वाजेपर्यंत समुद्राच्या वाळूत चाललेल्या गाण्यांच्या भेंड्या तर सदैव ध्यानात रहणाऱ्या. शैलेश आणि मेधा रात्री दोन वाजता समुद्राच्या काठावर सर्वांसोबत थोडेही न दमता, त्याच उत्साहात सहभागी झाले, त्यांच्या या उत्साहाचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत.

कधी तरी शेवटचा दिवस उजाडणारच होता. सर्वच बर्यापैकी निवांत होते. विजयने मसाजर्सची सोय केलेली होती. सर्वानिच आपली दमलेले पाय त्या मसाजर्सच्या हवाली केले आणि दुपारी जेवण उरकून निघण्याच्या वेळ जवळ येवून ठेपली. बॅगा भरल्या. पावलं आता जड होत होती, पण ईलाज नव्हता.  

प्रत्येकानेच आपल्या तीस वर्षानंतर भेटणाऱ्या मित्र-मैत्रिनिंच्या साठी काही भेट वस्तु अनाल्या होत्या. कुणी कप-त्यावर चित्रित केलेले फोटो-साईं बाबांची मूर्ति, कुणी दिलेली अत्तराची कुपी, कुणी गोव्याचा मेवा, तर कुणी घड्याळ. कुणी भावना शब्दबद्ध केल्या, तर कुणी सोवेनिएर्स दिले. अशा कितीतरी भेटीनी मन पुरतं हेलावून गेलं.

जाफरभाईच्या समवेत मंदिरात मिळालेला प्रसाद, माहेरी आलेल्या या मुलींच्या, आई-अम्बाबाईच्या दारात भरलेल्या ओटया, भूतदयेच जिवंत उदहारण म्हणून; शैलेशच्या घरी ट्यूमर झालेल्या अवस्थेतही कुटूम्बाचा सदस्य असल्या सारखी घेतली जाणारी; मुक्या प्राण्याची काळजी, गेल्या तीस वर्षात सासरी काम करताना दमून गेलेल्या सासुरवाशिनिंच्या दमलेल्या पायाना माहेरी आल्याची भावना ठेवून केलेले मालिश, गावच्या यात्रेत सगळ्या पोराबाळाना नवे कपडे घ्यावेत, तसे सुप्रियाच्याआई-बाबानी सगळ्याना घेतलेले कपडे आणि सरते शेवटी जाफरभाई-किशोर-आणि-धनराज राहत असलेल्या एका रूम मध्ये रंगलेली ती शेवटची मैफिल, आपल्यातील परिपक्व़तेला साद घालणारे त्यातले सगळे विषय आणि निघताना सगळ्यानीच एकमेकांची गळा भरून घेतलेली भेट, डोळ्यातुन न थांबणारे अश्रु आणि वडिलधाऱ्या भावासारखा जाफरभाईचा डोक्यावरुन फिरणारा सांत्वनाचा हात…..सगळेच निशब्द, सगळेच अबोल.    

         “कसंय बाबा, ठीकाय ना? काळजी घे. वहिनी, पोरं बरी आहे ना? ठेवून दे, ठेवून दे फोन, गड़बड़ीत असशील.’ असा जाफरभाईचा न चुकता रविवारी येणारा फोन अगदी सुरवातीला नकोसा वाटायचा, आता आज मात्र मी त्या फोनची वाट पहात बसलो आहे.

                                                                                                            प्राध्यापक (डॉ) विवेक रणखांबे, पुणे

                                                                                                                                      9850558404

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *